क्रिकेट आणि बॉलीवुडमधल्या दिग्गज फुटबॉलच्या मैदानात

April 13, 2014 6:48 PM0 commentsViews: 2261

indian super leage13 एप्रिल : क्रिकेट आणि बॉलीवुडमधले दिग्गज आता फुटबॉलमध्येही नशीब आजमावत आहेत.  ‘इंडियन सुपर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या फ्रेंचायजींच्या मालकांची आज घोषणा करण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोची टीम विकत घेतली आहे. तर सर्वांचा लाडका ‘दादा’ म्हणजेच सौरव गांगुलीने कोलकाता टीम विकत घेतली आहे. या टीमसाठी गांगुली आणि शाहरुख खान दोघांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती.

यंदा सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये होणा-या या लीगमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याने फुटबॉलकडे लक्ष वळविले आहे. त्याने पीव्हीपी व्हेंचर्सच्या साथीने कोची संघाची फ्रेंचायजी मिळविली आहे. तर, माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्या घरच्या कोलकता संघाची फ्रेंचायजी मिळविली आहे. याशिवाय बॉलिवुड अभिनेते सलमान खान, रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम यांनीसुद्धा संघांची फ्रेंचायजी मिळविली आहे. या बड्या स्टारमुळे या स्पर्धेलाही आयपीएलइतकीच प्रसिद्धी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
फ्रेंचायजी पुढीलप्रमाणे -
  • कोची – सचिन तेंडुलकर आणि पीव्हीपी व्हेंचर्स
  • बंगळुर –  द सन ग्रुप
  • कोलकता – सौरव गांगुली, हर्षवर्धन निओटीया, ऍटलिटीको मद्रीद, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख
  • मुंबई – रणबीर कपूर आणि विमल पारेख
  • पुणे – सलमान खान, कपिल वाधवान आणि धिरज वाधवान
  • गुवाहाटी – जॉन अब्राहम आणि शिलाँग लजाँग
  • दिल्ली –  समीर मनचंदा यांचा डेन नेटवर्क
  • गोवा    –  वेणूगोपाळ धूत (व्हिडिओकॉन), दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास व्ही. डेंपो

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close