लाहोरमधली धुमश्चक्री थांबली : 4 अतिरेकी ठार, 6 अतिरेक्यांना जिवंत पकडलं

March 30, 2009 1:45 PM0 commentsViews: 4

30 मार्च, इस्लामाबादलाहोरमध्ये मनावाइथल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवरचं अतिरेक्यांविरोधातलं जवानांचं ऑपरेशन अखेर झालं. या ऑपरेशनमध्ये 4 अतिरेक्यांना कंठस्थान घातलं तर 6 अतिरेक्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तशी माहिती पाक सरकारने दिली आहे. आज सोमवारी सकाळी साडे सात वाजता लाहोरमधल्या पोलीस ट्रेनिंग कॅम्पमध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी केली होती. आणि इमारतीचा ताबा घेतला होता. तब्बल आठ तास ही चकमक सुरू होती. त्यात 27 जण ठार झालेत. तर दीडशे जण जखमी झालेत. जवळपास आठशे पोलीस या इमारतीत होते. अखेर पोलिसांनी या अतिरेक्यांना इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून जिवंत पकडण्यात यश मिळवलं. पकडलेल्या अतिरेक्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं आहे.

close