ज्ये. समाजसेवक अण्णा हजारेंना मा. दीनानाथ मंगेशकर ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

April 13, 2014 6:18 PM0 commentsViews: 297

anna hazare_kejriwal13 एप्रिल : कला व साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा पंढरीनाथ कोल्हापुरे, तबलावाक उस्ताद झाकीर हुसैन, शिवाजी साटम आणि अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. २४ एप्रिल रोजी मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मास्टर दीनानाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २४ एप्रिल रोजी मा.दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येतात. कला, संगीत, पत्रकारीता, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणार्‍यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रविवारी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी मा. दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी ख्यातनाम तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन व पंढरीनाथ कोल्हापुरे यांना मा.दीनानाथ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर शिवाजी साटम व ऋषी कपूर यांना चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर उत्कृष्ट नाट्य निर्मितीबद्दलचा मोहन वाघ पुरस्कार दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांच्या छापा-काटा या नाटकास जाहीर झाला आहे.

मा. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार

  •  प्रदीर्घ संगीत सेवा – पंढरीनाथ कोल्हापुरे, उस्ताद झाकीर हुसेन
  •  सामाजिक सेवेबद्दल जीवनगौरव पुरस्कार – अण्णा हजारे
  •  मा.दीनानाथ मंगेशकर पत्रकारीता पुरस्कार – प्रकाश बाळ, अनंत दीक्षित
  •  चित्रपटातील प्रदीर्घ सेवा – शिवाजी साटम, ऋषी कपूर
  •  साहित्य क्षेत्रातील वाग्विलासिनी पुरस्कार – डॉ.आनंद यादव
  •  सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी आनंदमयी पुरस्कार – खरे वाचन मंदिर, मिरज
  •  उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार – छापा-काटा

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close