मोदींनी घेतली सुपरस्टार रजनीकांतची भेट

April 13, 2014 8:18 PM0 commentsViews: 1825

ÃÖ¦ËüÝÖ ßÖê¸ü»ÖÝÖÛúÖê»Öæ13 एप्रिल :  भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली. मोदी आणि मी दोघेही एकमेकांचे चंगले मित्र असूनही सदिच्छा भेट असल्याचं रजनीकांत यांनी सांगितलं. तर मोदींनीही रजनीकांत यांना तामीळ नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी हे रविवारी चेन्नईत सभेसाठी आले असून सभेपूर्वी त्यांनी चेन्नईत रजनीकांत यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मी आजारी असताना मोदी मला भेटायला आले होते. त्यावेळी मी त्यांना चेन्नईत असताना आवर्जून घरी या असे आमंत्रण दिले होते. आपली तब्येत बरी नव्हती, तेव्हा मोदींनी मला सदिच्छा दिल्या होत्या. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. तेव्ही मी त्यांना शुभेच्छा देतो, असंही रजनीकांतनं म्हटलं. मोदींनीही रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या.

दक्षिण भारतात रजनीकांत यांना देवाच्या स्थानावर ठेवून त्यांची पूजा केली जाते, यावरुनच त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. याच पार्श्वभूमीवर मोदींनाही रजनीकांत यांना भेटण्याचा मोह आवरलेला नाही. दरम्यान, या भेटीमागे राजकीय उद्देश नसल्याचे रजनीकांत व मोदींनी सांगितले असले तरी लोकसभा निवडणुकीत तामीळनाडूमध्ये भाजपला फायदा व्हावा या मोदी रजनीकांत यांच्या दारी पोहोचल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close