बेगामे शादी मे अब्दुला दिवाना- गोपीनाथ मुंडे

April 13, 2014 7:37 PM0 commentsViews: 1719

567_munde_sot13 एप्रिल :  नरेंद्र मोदींना उतावळा नवरा म्हणणारे शरद पवार मागील २५ वर्षांपासून पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. शरद पवार यांच वागण म्हणजे ‘बेगामे शादी मे अब्दुला दिवाना’ असे म्हणत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उडवली आहे.

बारामती येथे महयुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असाा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.   पाण्यासाठी आंदोलने करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करंगळी दाखवली. अजित पवारांना सत्तेची मस्ती आहे. यामुळेच ते अशा प्रतिक्रिया देत असल्याचे म्हणत मुंडे यांनी यावेळी आजित पवारांवर निशाणा साधला.

close