पिलिभितमध्ये भाजप प्रचार : अडवाणी-राजनाथ सिंग घेणार सभा

March 31, 2009 7:27 AM0 commentsViews: 5

31 मार्च, पिलिभितवरूण गांधींच्या अनुपस्थितीत पिलिभितमध्ये भाजप प्रचाराचा किल्ला लढवण्यास लालकृष्ण अडवाणींपासून राजनाथ सिंग सभेत उतरणार आहेत. वरूण गांधींच्या अनुपस्थितीत भाजपच्या प्रचारावर परिणाम होऊ नये यासाठी पक्षाकडून खास खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक झालेल्या वरुण गांधींना जामीन मिळाला असला तरी किमान तीन आठवडे तुरूंगात रहावं लागणार आहे. त्यांच्यावर उत्तरप्रदेश सरकारनं रासुका लावल्यानं त्यांची सुटका लांबणीवर गेली आहे. मात्र वरूण गांधी यांना निवडणूक लढवता येणार असल्यानं भाजपनं त्यांचा प्रचार सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा मंगळवारचा दिवस पिलिभितमध्ये काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे. पिलिभितमध्ये भाजपनं उद्या बुधवारी बंदचा इशारा दिला आहे. तर वरूण गांधींना निवडणूक प्रचारासाठी बोलवू नये असा निर्णय मध्यप्रदेश भाजपनं घेतलाय. मुसलमान मतदारांना दुखावू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

close