कोकण रेल्वेची वाहतूक पुढचे 14 तास ठप्प

April 14, 2014 2:17 PM0 commentsViews: 1642

Image img_100012_konkanrail_240x180.jpg14 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी येथे मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे ऐन सुट्टीत प्रवाशांचे हाल झाले आहेत. रत्नागिरी- कोकण रेल्वेच्या मार्गावर हे डबे घसरलेत यामुळे आता जनशताब्दी एक्स्प्रेसला खेडमध्येच थांबवण्यात आली आहे. मालगाडीचे चार डबे घसरल्याने मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याहून मुंबईकडे येणार्‍या रेल्वे गाड्या खोळंबल्या आहे.

अपघातानंतर कोकण रेल्वेचे कर्मचारी पथक घटनास्थळी दाखल झाले असून डबे बाजूला करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र या कामाला आणखी 12 ते 14 तास लागण्याची शक्यता असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
 
गेल्या आठवड्यातही निवसर-आडवली दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. आता पुन्हा अशी घटना घडल्याने जनशताब्दी एक्स्प्रेस खेडमध्ये खोळंबली आहे.रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होताहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close