बाबासाहेबांनी वापरलेल्या 400 पेक्षा जास्त वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर

April 14, 2014 10:12 AM0 commentsViews: 422

प्रवीण मुधोळकर , नागपूर.
14 एप्रिल :  नागपूरजवळच्या चिंचोलीच्या ‘शांतीवना’त ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चारशेच्यावर वस्तू सरकारी अनास्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हा जागा दगडखाणींसाठी आरक्षित केल्याने या वास्तूचं भवितव्यही धोक्यात आलंय.

कसर लागलेले कोट, शर्ट, टाय.. ही कोणाच्या घरातल्या वस्तूंची दुरवस्था नाही.. ही दुरवस्था आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जपलेल्या आठवणींची… हा पुरावा आहे शासनाच्या बेफिकीर वृत्तीचा.. बाबासाहेबांचं कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी मोठ्या मेहनतीनं हे शांतीवन वास्तू संग्रहालय उभारण्यात आलं. राज्यघटना तयार करण्यासाठी वापरलेला टाईप रायटर आणि घटनेच्या कच्च्या मुसद्याचंही इथे जतन करण्यात आलंय. आज या वस्तूंना वाचवण्यासाठी केमिकल ट्रिटमेण्टची गरज आहे. पण मदत जाहीर होऊनही अजून शांतीवनपर्यंत एकाही पैशाची मदत पोहोचलेली नाही.

बाबासाहेबांच्या वस्तूंकडे होणारं दुर्लक्ष बघून आता सामान्य नागरिकांनीच पुढाकार घेतलाय. देणग्यांच्या माध्यमातून या वस्तूंच्या जनतीकरणासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी केलाय.

व्होट बँकेच्या राजकारणासाठी आंबेडकरांचं स्मारक बांधण्याच्या, त्याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याच्या गप्पा मारणारे नेते प्रत्यक्षात कसे वागतात याचं उदाहरण या निमित्ताने सामान्यांसमोर आलंय. आता या वस्तूंची आणखी हानी होऊ नये एवढीच त्यांची अपेक्षा आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शांतीवन येथील संग्रहालयासाठी राज्य सरकारने 40 कोटी रुपये मंजूर केले होते. पण ही जागा दगडखाणींसाठी आरक्षीत असल्याने ही फसवणूक होती काय असा सवाल उपस्थीत होतो.

एनआयटीला नोडल एजन्सी म्हणून नेमून 32 कोटी 54 लाखाचे शातीवन विकासाचे टेंडर काढण्यात आले होते. पण ही जागा स्टोन क्वेरी साठी आरक्षीत असल्याचे सरकारने पत्र दिले आहे त्यामुळे आता ही कामे होवू शकत असे एनआयटीने सांगितले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close