काँग्रेस आम आदमीसोबत – राहुल गांधी

March 31, 2009 7:38 AM0 commentsViews: 3

31 मार्च, वर्धा काँग्रेस का हात आम आदमी के साथ, असा नारा राहुल गांधी यांनी आज मंगळवारी वर्ध्याच्या प्रचार सभेत दिला. राहुल गांधी यांनी वर्ध्यातून काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात केली. राहुल गांधी दत्ता मेघे यांच्या प्रचारासाठी आज मंगळवारी वर्ध्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते.आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी, काँग्रेस आम आदमी बरोबर असल्याचं सांगितलं. निवडणुकांमध्ये विरोधीपक्ष सामान्या लोकांचे प्रश्न न मांडता, वेगळेच मुद्दे उपस्थित करतात अशी टीकाही त्यांनी केली. तसंच भाजपनं त्यांच्या काळात दहशतवाद्यापुढं गुडघे टेकले होते, अशी विरोधकांवर टीका राहुल यांनी केली. राहुल गांधींनी भाषणात गांधीजींच्या आठवणीही जागवल्या. त्यांनी वर्ध्यातल्या बापू कुट्टी आश्रमालाही भेट दिली.

close