सिंधुदुर्गात नरकासुराचा वध करा -केसरकर

April 14, 2014 3:24 PM1 commentViews: 3602

deepak kesarkar14 एप्रिल :सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राष्ट्रवादीचा वाद आणखी चिघळलाय. कोकणात नरकासुराचा वध झाल्याशिवाय लक्ष्मी येणार नाही. या निवडणुकीत नरकासुराचा वध करा असं आवाहन राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचं नावं न घेता आपल्या समर्थकांना आणि मतदारांना केलंय.

तसंच वध करण्यासाठी तुम्हाला धनुष्यबाण वापरायच की नाही हे तुम्ही ठरवा असं सांगत शिवसेनेला मतदान करा राणेंना पाडा असंही आवाहन केसरकरांनी केलंय. केसरकरांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘धनुष्यबाण’ वापरणा असा साद दिलाय. केसरकरांच्या या भूमिकेमुळे राणे समर्थकांच्या गोटात आता चांगलीच खळबळ उडालीय.

गेल्या आठवड्याभरापासून सिंधुदुर्गात उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मुलगा डॉ.निलेश राणे यांचा प्रचार न करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. आपल्या भूमिकेवर ठाम राहत राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी राजीनामा सुद्धा देऊ केलाय. राणे विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद मिटवण्यासाठी खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गात सभाही घेतली. ऐन वेळी ‘आमच्या कार्यकर्त्यांना अवदसा आठवली’ अशी टीकाही पवारांनी केली.

पण कार्यकर्ते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून आता थेट राणेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातल्या राणेंच्या दहशतीला विरोध केलाय. सावंतवाडी इथं झालेल्या सभेत केसरकरांनी राणेंवर ‘प्रहार’ केलाय. राणेंना मदत केली असती तर किमान मंत्रीपद मिळालं असतं. पण सिंधुदुर्गाच्या विकासाची आपल्याला काळजी असल्याचं केसरकर म्हणाले.

नरकासुराचा वध झाल्याशिवाय कोकणात लक्ष्मी येणार नाही. या निवडणुकीत नरकासुराचा वध करा. म्हैसासुर मर्दणीने वध करण्यासाठी त्रिशुळ वापरले होते. या नरकासुराचा वध करण्यासाठी रामने वापरलेलं धनुष्यबाण वापरायच हे तुम्ही ठरवा.या निवडणुकीत राणेंच्या नावासमोरचं नाही तर विरोधकांच्या नावासमोरचं बटण दाबा असं आवाहनही केसकर यांनी केलं. यावेळी या मेळाव्यात राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकार्‍यांनी शिवसेनेला मतदान करण्याची मागणी एकमुखाने केली आहे.  

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Avinash Desai

    Excellent …. Great.!!! I really appreciate the courage of Mr. Kesarkar. He deserves a Palakmantri position of Sindhudurg and I am sure he has the great great great..superb future in Konkan!!!! Hats Off Deepak Bhai… You did the most difficult thing for us!!!

close