पत्नीची प्रतिष्ठा न राखणारे देशाची प्रतिष्ठा काय राखणार ?-पाटील

April 14, 2014 2:46 PM0 commentsViews: 943

452r r pati_on_modi14 एप्रिल : जो पत्नीची प्रतिष्ठा राखू शकत नाही तो देशाची प्रतिष्ठा कशी राखणार, असा सवाल राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला.

त्याचबरोबर जे घर एकत्र ठेवू शकत नाहीत ते सत्तेत आल्यास काय करणार अशी बोचरी टीकाही आबांनी ठाकरे बंधुंवर केलीय. डोंबिवलीच्या लौकिकाला साजेसा खासदार दिल्लीत पाठवा असं आवाहन त्यांनी इथल्या मतदारांना केलं.

डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यासाठी प्रचारसभेत आर.आर.पाटील यांची हजेरी लावली यावेळी ते बोलत होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close