‘काँग्रेसने मुलगी गिळली’

April 14, 2014 6:59 PM0 commentsViews: 3316

14 एप्रिल : आपल्या मुलीचा बळी काँग्रेसनं घेतला त्यामुळे आपण मतदानावर बहिष्कार घालत आहेत असं कल्पना गिरीच्या आईवडीलांनी जाहीर केलंय. राहुल गांधींना आपल्या पदाधिकर्‍यांच्या जाीवाचं मोल कळत असेल तर त्यांनी आमच्या घरी भेट द्यावी असं आवाहन कल्पना गिरीच्या आईवडिलांनी केलं होतं.

कल्पना गिरी हत्याकांड
– 21 मार्च – रंगपंचमीच्या दिवशी आमदार अमित देशमुख यांंच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडल्या
– 22 मार्च – MIDC पोलीस स्थानकात तिच्या पालकांनी कल्पना हरवल्याची तक्रार दाखल केली
– 24 मार्च – तुळजापूर जवळच्या पाचुंगा तलावाजवळ कल्पनाचा मृतदेह सापडला
– 28 मार्च – महेंद्रसिंग चौहान आणि संदीप किल्लारीकर या काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना अटक
– महेंद्रसिंग चौहान – लातूर शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष
– 30 मार्च – कल्पना गिरीचा मोबाईल आरोपी महेंद्रसिंग चौहानच्या शेतातल्या विहिरीत सापडला
– 30 मार्च – याच दिवशी संदीप किल्लारीकरनं महेंद्रसिंग चौहान यानेच कल्पनाचा खून केल्याची कबुली दिली
– 12 एप्रिल – श्रीरंग ठाकूर नावाच्या आणखी एका संशयिताला अटक
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close