राणे समर्थकांकडून गाडीची तोडफोड, खोतांचा आरोप

April 14, 2014 5:30 PM1 commentViews: 1439

14 एप्रिल : सिंधुदुर्गात एकीकडे राणे विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरू आहे तर दुसरीकडे उद्योगमंत्री नारायण राणेंना सोडून अलीकडेच शिवसेनेत दाखल झालेले गौरीशंकर खोत यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. कणकवलीजवळच्या तरंदळे गावात प्रचारासाठी आपण गेलो असताना आपल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून गाडीची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार खोत यांनी कणकवली पोलीस स्थानकात दिलीय. राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही गुंडगिरी केल्याचा आरोप खोत यांनी केला असून या घटनेमुळे काही काळ कणकवली पोलीस स्थानकात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • umesh jamsandekar

    कोकणातल्या ह्याच प्रवृत्तीचा विरोध केसरकर आणि कोकणातील जनता करत आहे. जितक्या अश्या घटना घडतील तेवढाच फायदा विरोधकांचा होईल हे लक्षात ठेवून कोकणात केलेल्या विकास कामांचा दाखला देवून निवडणूक लढवा नाहीतर कोकणी मानस चिडली की काय करतात हे तुम्हाला सांगायला नको असे मला वाटत.

close