24 तासानंतर कोकण रेल्वेची वाहतुक सुरळीत

April 15, 2014 9:37 AM0 commentsViews: 404

Konkan railway15 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातील काल उक्षी रेल्वेस्थानकाजवळील मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज 24 तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली आहे.

मालगाडीचे पाच डबे घसरल्यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. काल (सोमवारी) सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली होती. मालगाडीचे डबे घसरण्याची गेल्या आठवडाभरातील ही दुसरी घटना होती. रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. कोकण रेल्वे मार्ग पूर्णपणे दुरुस्त झाला आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.

close