तृतीयपंथीयांना आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षण !

April 15, 2014 12:21 PM0 commentsViews: 1052

transgenders new15 एप्रिल : समाजातील तृतीयपंथी अर्थात ट्रांसजेंडर्स यांना ‘थर्ड जेंडर’ म्हणून कायदेशीर ओळख देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने आज (मंगळवारी) दिला.

तृतीयपंथीयांचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत समावेश करून घेण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने आज केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे ट्रांसजेंडर्स यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

याबाबत अस्तित्व संस्थेची संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तृतीयपंथीयांना आता मागास समाज म्हणून विशेष वागणूक मिळेल.

तसेच त्यांना मागास समाज म्हणून विशेष वागणूक द्यावी, असे सांगत तृतीयपंथीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तृतीयपंथीयांना आता दत्तकही घेता येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close