शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

April 15, 2014 11:19 AM0 commentsViews: 773

kolhapur crime15 एप्रिल :  अकोलामधल्या बाखराबाद या गावात सोमवारी शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. यात तीन पुरुषांसह एका महिलेचाही समावेश आहे. काल संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हत्या झाली.

एकाच कुटुंबातील वडील, दोन भाऊ आणि एका बहिणीचा कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. गजानन माळी, नंदू माळी आणि दिपक माळी अशी आरोपींची नावं आहे. या तीन आरोपींपैकी गजानन माळी व नंदेश माळी या दोघा बापलेकांना अटक केली आहे. दीपक माळी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी उरड पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

close