संजय दत्तला उमेदवारी नाही : सुप्रिम कोर्टाचा निकाल

March 31, 2009 10:47 AM0 commentsViews: 10

31 मार्च, दिल्ली अभिनेता संजय दत्तला आगामी लोकसभा निवडणूक लढवायला सुप्रिम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे संजय दत्तला आगामी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाहीये. समाजवादी पार्टीचे अमरसिंग यांनी संजयला लखनऊमधून उमेदवारी देऊ केली होती. दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी तुरूंगावासाची शिक्षा झालेल्या व्यक्तीला कायद्यानं निवडणूक लढवण्यास बंदी आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्तला कोर्टानं सहा वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा दिली असल्यानं त्याच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह होतं. संजय दत्तला सध्या जामिनावर सोडण्यात आलेलं आहे. अशी गुन्हेगारी पार्श्वभ्‌ूमी पाहता संजय दत्तला निवडणूक लढवता येणं जरा कठीण बनलं होतं. आपल्याला निवडणूक लढवण्यास परवानगी मिळावी, यासाठी संजय दत्तनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी संजय दत्तनं केली होती. सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं सीबीआय आणि संजयच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. आणि याबाबतचा निकाल राखून ठेवला. पण अखेर आज मंगळवारी संजय दत्त लोकसभेची निवडणूक लढवू शकतो की नाही यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. त्याला निवडणूक लढवता येणार नाहीये. संजयच्या ऐवजी लखनऊमधून मान्यताला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

close