भारतीय वंशाचे विजय शेषाद्री यांना पुलित्झर पुरस्कार

April 15, 2014 9:17 AM0 commentsViews: 74

vijay-seshadri15 एप्रिल : 98वे पुलित्झर पुरस्कार कोलंबिया विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत. मूळचे भारतीय असणार्‍या विजय शेषाद्री यांनी यंदाचा सन्मानाचा पुलित्झर पुरस्कार पटकावला आहे. त्यांच्या 3 सेक्शन्स या कवितासंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

भारतातल्या बंगळुरूमध्ये जन्म झालेल्या विजय वयाच्या 5 वर्षापासूनच अमेरिकेत राहत आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एमएफएची पदवी घेतली.

विजय शेषाद्री सध्या सारा लॉरेन्स कॉलेजमध्ये काव्य आणि कथाबाह्य लेखन शिकवतात. मूळचे भारतीय असणार्‍या विजय शेषाद्री यांना यंदाचा सन्मानाचा पुलित्झर पुरस्कार. वाईल्ड किंग्डम, द लाँग मिडो, थ्री सेक्शन्स ही त्यांची गजलेली पुस्तकं. त्यापैकीच त्यांच्या ‘थ्री सेक्शन्स’ या कवितासंग्रहासाठी पुरस्कार मिळाला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close