गांधी विरुद्ध गांधी वाक्‌युद्ध सुरूच, वरुण गांधी विश्वासघाती !

April 15, 2014 5:24 PM0 commentsViews: 1001

varaun_gandhi_vs_priyanka_gandhi15 एप्रिल : बहिण प्रियंका गांधी आणि त्यांचे चुलत भाऊ वरूण गांधी यांच्या पुन्हा शाब्दिक युद्ध रंगलंय. आपण सभ्यतेची मर्यादा कधीच ओलांडली नाही, व्यक्तिगत हल्ले करण्यापेक्षा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करायला हवं असं प्रत्युत्तर भाजपचे नेते वरुण गांधी यांनी प्रियांका गांधी यांना दिलंय.

तर प्रियंका यांनी वरूण यांच्या 2009 च्या प्रक्षोभक भाषणाची आठवण करून दिली आणि ही विचारांची लढाई असल्याचा खोचक टोला लगावलाय. वरुण गांधींनी आमच्या कुटुंबासोबत विश्वासघात केलाय. माझ्या वडिलांनी देशाच्या एकतेसाठी आपला जीव दिला. पण आज जर देशाच्या एकतेला कुणी नुकसान पोहचवत असेल तर त्याला माफ करणार नाही मग त्याठिकाणी माझा मुलगा जरी असला तरीही त्याला माफ करणार नाही असंही प्रियांका म्हणाल्यात.

दोन दिवसांपूर्वी “वरूण हे गांधी असले आणि माझे भाऊ असले तरी ते वाट चुकलेत” अशी टीका प्रियंका गांधींनी केली होती. त्यांच्या या टीकेनंतर गांधी विरुद्ध गांधी असं वाकयुद्ध रंगलंय. दरम्यान, वरूण गांधी यांनी आज सुलतानपूरमध्ये अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रोड शो केला. वरुण यांचा पूर्वीचा मतदारसंघ पिलभित होता. वरुण गांधी यांचे वडील संजय गांधी यांनी 1970 मध्ये सुलतानपूरमधूनच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close