प्रचाराच्या तोफा थंडावल्या, दिग्गजांची 17 एप्रिलला परीक्षा

April 15, 2014 6:37 PM0 commentsViews: 4473
प्रचाराच्या तोफा थंडावल्या, दिग्गजांची 17 एप्रिलला परीक्षा

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, दिग्गजांची 17 एप्रिलला परीक्षा

15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशातल्या पाचव्या टप्प्यासाठीचा तर राज्यात दुसर्‍या टप्प्यासाठीचा प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आज (मंगळवारी) शेवटच्या दिवशी दिग्गजांनी राज्यभरात प्रचार सभा घेऊन प्रचाराचा शेवट केला.

राज्यातल्या 19 जागांसाठी 17 तारखेला मतदान होणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातल्या काही जागांसाठी मतदान होणार आहे. देशातल्या 12 राज्यांमध्ये 121 जागांसाठी 17 तारखेला मतदान होणार आहे.

राज्यामध्ये पाचव्या टप्प्यात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, डॉ.निलेश राणे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रतिष्ठापणाला लागलीय.

राज्यातील काही बिग फाईट्स

बीड

 • भाजप – गोपीनाथ मुंडे
 • काँग्रेस – सुरेश धस
 • आप – नंदू माधव

नांदेड

 • काँग्रेस – अशोक चव्हाण
 • भाजप – डी. बी. पाटील
 • बसपा – डॉ. हंसराज वैद्य

उस्मानाबाद

 • राष्ट्रवादी – पद्मसिंह पाटील
 • शिवसेना – प्रा. रविंद्र गायकवाड

बारामती

 • राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे
 • राष्ट्रीय समाज पक्ष – महादेव जानकर
 • आप -सुरेश खोपडे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 • काँग्रेस -निलेश राणे
 • शिवसेना – विनायक राऊत

पुणे -

 • काँग्रेस – विश्वजीत कदम
 • भाजप – अनिल शिरोळे
 • मनसे – दीपक पायगुडे
 • आप – सुभाष वारे

मावळ -
राष्ट्रवादी – राहुल नार्वेकर
शिवसेना – श्रीरंग बारणे
शेकाप – लक्ष्मण जगताप
आप – मारुती भापकर

शिर्डी

 • काँग्रेस – भाऊसाहेब वाकचौरे
 • शिवसेना – सदाशिव लोखंडे

सोलापूर

 • काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे
 • भाजप – शरद बनसोडे
 • आप – ललित बाबर

माढा

 • राष्ट्रवादी – विजयसिंह मोहिते पाटील
 • स्वाभिमानी शेतकरी संघटना – सदाभाऊ खोत
 • आप – ऍड.सविता शिंदे
 • अपक्ष – प्रताप सिंह मोहिते पाटील

हातकणंगले

 • स्वाभिमानी शेतकरी संघटना – राजू शेट्टी
 • काँग्रेस – कलाप्पा आवाडे
 • आप – रघुनाथ पाटील
 • अपक्ष – सुरेश पाटील

सातारा

 • राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले
 • आरपीआय – अशोक गायकवाड
 • आप – राजेंद्र चोरगे
 • अपक्ष – संदीप मोझर
 • अपक्ष – पुरुषोत्तम जाधव
 • अपक्ष – वर्षा माडगूळकर

 
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close