मतांचा जोगवा,राजनाथ सिंह मौलानांच्या भेटीला

April 15, 2014 8:25 PM0 commentsViews: 870

15 एप्रिल : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीत शाही इमाम यांच्या भेटीवर टीका करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीच आता मुस्लीम समाजाच्या धार्मिक नेत्यांची भेट घेतलीय. भाजपला पाठिंबा मिळवण्यासाठी सोमवारी त्यांनी लखनौमध्ये मुस्लीम धर्मगुरूंची भेट घेतली. या भेटीमागे राजकारण नसल्याचा दावा राजनाथ सिंहांनी केलाय. पण, राजनाथनी आपला पाठिंबा मागितल्याचं मुस्लीम धर्मगुरूंनी सांगितलंय.लखनौ हा राजनाथ सिंह यांचा मतदारसंघ असून ते तिथून निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गुजरात दंगली प्रकरणी माफीमागण्याची तयारीही सिंह यांनी बोलून दाखवली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close