‘राज’नीती, गोपीनाथ मुंडेंना मनसेचा पाठिंबा

April 15, 2014 9:06 PM3 commentsViews: 4048

raj_munde15 एप्रिल : ठाकरे बंधूंच्या ‘टाळी’साठी सदैव प्रयत्न करण्यात आघाडीवर असणारे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंब्याची ‘टाळी’ दिलीय. गोपीनाथ मुंडेंवर सातत्यानं टीका करणारे राज ठाकरेंनी आता बीडमध्ये मुंडेंना पाठिंबा जाहीर केलाय.

गोपीनाथ मुंडे यांनी फोन करून आपल्या पाठिंबा मागितला. त्यामुळे फक्त बीडमध्येच आम्ही मुंडेंना पाठिंबा दिला असल्याचं राज ठाकरे यांनी जोगेश्वरी इथं झालेल्या सभेत स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मनसेनं या अगोदरच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलाय.

विशेष म्हणजे मध्यंतरी राज आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे महायुतीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पण या भेटीमागे मुंडे-गडकरी गटाचा वाद असल्याची चर्चा सुरू होती. एवढंच नाही तर या भेटीनंतर मुंडे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर भरपूर आरोप-प्रत्यारोप केले होते. पण आता मनसे-शिवसेना यांच्यातल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मुंडे यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालंय.

 • umesh jamsandekar

  गोपीनाथ मुंडे यांनी राज ठाकरे यांना फोन करून बीड या आपल्या मतदारसंघात मनसेचा पाठींबा मागितला असे राज यांनी मुंबईत झालेल्या जाहीर सभेत सांगितले. गोपीनाथ मुंडे हे महायुतीचे नेते आणि भाजप चे महाराष्ट्रातील प्रमुख नेते असून सुद्धा त्यांना स्वतावर, पक्षावर, महायुतीवर आणि साऱ्या देशाने डोक्यावर घेवून विश्वास दाखवलेल्या आपल्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदीवर विश्वास राहिलेला दिसत नाही. कदाचित या सर्वापेक्षा त्यांना आपल्या विजयासाठी राज ठाकरे यांच्यावर जास्त विश्वास वाटत असावा. ज्या व्यक्तीला मनसेचा उमेदवार नसतानाही एवढी भीती वाटत आहे त्यांच्यापेक्षा खरोखरच शिवसेनेच्या उमेदवारांच कौतुक केल पाहिजे की मनसेचा उमेदवार असून सुद्धा मराठी माणसाच्या विश्वासावर आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विजयाची खात्री ठेवून सामना करीत आहेत. मुंडे आणि गडकरी तुमचा विजय जरी झाला तरी त्या विजयात तुमचा खरा वाटा नसणार हे लक्षात ठेवा. मोदींच सरकार आल तरी देशात तुमची मंत्रीपदी नेमणूक झाली तर तो पक्षाचा आणि महायुतीचा विश्वासघात असेल हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही दोघेही मानसिक दृष्ट्या कमजोर आहात. अशी माणसे इतरांना काय न्याय देणार.

  • Swapniltk

   मुंडे, राणे, भुजबळ यांच्या विरुद्ध अनेक वर्षांपासून ठरवलेल कारस्थान आता प्रत्यक्षात येत आहे. हे दिग्गज नेते आहेत म्हणूनच त्यांना पाडायला सर्व पक्ष एकत्र आले अहेत. ह्या खेळीमध्ये मिळेल त्याची मदत घेण भाग पडत आहे.

   शिवसेनेच्या काही मोजक्या लोकांनी राज ठाकरेंना दिलेली अपमानास्पद वागणूक त्यांना भविष्यात किती महागात पडेल ते समजेलच

 • sanjay

  he punha chicken soup sarkhech……mothepana karaycha aani paani otaych…..sorry soup otaych

close