पक्षासोबत एकनिष्ठ न राहणारे काय आव्हान देणार ?-राणे

April 15, 2014 9:48 PM0 commentsViews: 2254

15 एप्रिल : दीपक केसरकर यांची भूमिका केवळ वैयक्तिक आणि स्वार्थासाठी आहे. शरद पवारांनी त्यांना एवढं मोठं केलं पण त्याची माणुसकी त्यांना नाही. म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशी टीका नारायण राणे यांनी केसरकर यांच्यावर केली.  तसंच जे त्यांच्या अध्यक्षांचा आदर राखत नाही ते मला काय आव्हान देणार असा खडा सवालही राणेंनी उपस्थित केला. सावंतवाडीमध्ये नारायण राणेंनी मुलगा निलेश राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन प्रचाराचा समारोप केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राणेंनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवरही सडकून टीका केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राणेंचा प्रचार न करण्याचं ठरवल्यामुळे राणेंसमोरच्या अडचणी वाढल्यायत. तर स्वत:च्या तत्त्वासाठी आमदारकी सोडणार्‍याला राणे आम्हाला काय चॅलेंज करणार असा सवाल दीपक केसरकरांनी राणेंना केलाय.

close