मनमोहन सिंग हे युपीएचे नव्हे काँग्रेसचे उमेदवार : पवारांचा टोला

April 1, 2009 6:15 AM0 commentsViews: 1

1 एप्रिल, अकलूज डॉ. मनमोहनसिंग हे युपीएचे नाही तर काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असं मत शरद पवार यांनी काल मंगळवारी अकलूजमध्ये व्यक्त केलं. यावरुन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण आहोत असे संकेत शरद पवार यांनी दिलेत. काल मंगळवारी अकलूजमध्ये एका जाहिर सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधानपदावरुन पुन्हा एकदा घुमजाव केलं. पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंगांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राहील, असं काँग्रेसनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. आता मात्र युपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अजून जाहीरच झालेला नाही, असा दावा पवारांनी केलाय. प्रत्येक पक्षाला आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे असं वाटण्यात गैर काय असा सवालही त्यांनी केला आहे.

close