‘सुबह का भुला…’,रावले सेनेत परतले

April 15, 2014 11:38 PM1 commentViews: 3393

shiv sena mohan ravale15 एप्रिल : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले सेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय.

आज (मंगळवारी) गिरगावमध्ये झालेल्या सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोहन रावलेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. रागाच्या भरात आपल्याकडून काही चुका झाल्या. मात्र आपण शिवसेनेशिवाय राहू शकत नाही, असं रावले यांनी म्हटलंय.

तसंच या सभेत उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदींना आमचा आधीपासूनच पाठिंबा आहे, पण आता काहीजण त्यांना उगाचच पाठिंबा देत आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी राजना लगावलाय.

विशेष म्हणजे मोहन रावले यांनी सेनेच्या पक्षनेतृत्वावर निशाणा साधत सडकून टीका केली होती. “शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे” अशी टीका रावले यांनी केली होती. रावले यांच्या टीकेनंतर सेनेनं तात्काळ रावलेंची सेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर रावले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण राष्ट्रवादीत त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही. ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पण राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळून रावले पुन्हा शिवसेनेत परतले आणि सेनेनंही “सुबह का भूला शाम को घर आ जाए…” असं म्हणत पक्षात घेतलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mahesh Bagul

    या चिमण्यांनो परत फिरारे

close