वरुण गांधींना मारण्याची छोटा शकिलने दिली सुपारी

April 1, 2009 6:24 AM0 commentsViews: 1

1 एप्रिल, पिलिभितवरुण गांधी आणि प्रमोद मुतालिक दाऊद गँगच्या हिटलीस्टवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपचे वादग्रस्त उमेदवार वरूण गांधी यांना मारण्याची सुपारी दाउद गँगच्या छोटा शकीलनं घेतल्याचं समजतं. या गँगचा एक शार्प शूटर रशीद मलबारी यानेच पोलिसांना ही माहिती दिली आहे. 27 मार्चला पोलिसांनी रशीदला अटक केली होती. रशीदच्या सांगण्यानुसार छोटा शकीलनेच वरूण गांधींना मारण्याची सुपारी घेतली होती. आणि हे काम त्यानं रशीदवर सोपवलं होतं. पिलिभितमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याने वरुण यांची एटाजेलमध्ये रवानगी करण्यात आल्याचं समजतं. आज बुधवारी विश्व हिंदू परिषदेनं पिलिभीत बंद पुकारलाय. वरुणवर रासूका लावण्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, शकील गँगच्या पाच जणांना मंगलोरमध्ये अटक करण्यात आलीये. हे पाच जण प्रमोद मुतालीकला मारण्यासाठी आले होते.

close