पुण्यात विश्वजीत कदम यांच्यासह आठ साथीदारांवर गुन्हा दाखल

April 16, 2014 11:28 AM0 commentsViews: 6317

vishwajeet kadam16 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेने केली आहे.

विश्वजीत कदम आणि त्यांच्या आठ साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय. या सर्व नऊ जणांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आहे. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांनी मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यातच ठाण मांडले. विश्वजीत कदम यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी पायगुडे यांनी केली. अखेरीस पोलिसांनी कदम यांच्यासह सर्व आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

पुण्याच्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये कलम 395 आणि 171 ई अंतर्गत हे गुन्हा दाखल झालेत. दरम्यान, दीपक पायगुडेंवर लोकांना जबरदस्तीनं पकडून ठेवल्याचा गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. त्यांच्यावरही ही कलमं लावण्यात आली आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

   

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close