हॅप्पी बर्थडे चार्ली!

April 16, 2014 11:50 AM0 commentsViews: 309

16 एप्रिल : आपल्या विनोदी अभिनयाने उभ्या जगाला भुरळ घालणार्‍या चार्ली चॅप्लिनचा आज 125वा जन्मदिवस आहे. मूकपटांच्या जमान्यात नावारुपाला आलेल्या या विनोदाच्या बादशहानं सिटी लाईट, द ग्रेट डिक्टेटर, द सर्कस, द किड, द गोल्ड रश, अशा एकसे बढकर एक सिनेमांतून त्यांनी सर्वसामान्य ट्रॅम्पची कहाणी लोकांसमोर मांडली. अतिशय करुण आयुष्यातून कल्पकतेने विनोदनिर्मिती घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच सर्वसामान्य प्रेक्षकांना ते अगदी आपले वाटत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close