आता नॅनो शोरुममध्ये

April 1, 2009 7:38 AM0 commentsViews: 2

1 एप्रिलयेणार म्हणता म्हणता नॅनो अखेर मार्केटमध्ये तर आलीच पण आजपासून टाटा ग्रुपची ही लाडकी नॅनो कार ग्राहकांना शोरूममध्ये पहायला मिळेल. नॅनो टाटांच्या क्रोमा आणि वेस्टसईड शोरूम्समध्ये डिसप्लेसाठी ठेवण्यात आलीय. नॅनोच्या मॉडेलची मूळ किंमत 1 लाख असेल तर इतर एलएक्स आणि एसएक्स मॉडेलची किंमत एक लाखाहून अधिक असेल. नॅनोचं बुकिंग मात्र 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. बुकिंगची शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. ही पिपल्स कार अंदाजे 1 लाख ग्राहकांना पुरवण्याचा टाटा मोटर्सचा मानस आहे.

close