‘दिल्ली’साठी मावळमध्ये धुमशान,चौरंगी लढत !

April 16, 2014 11:40 AM0 commentsViews: 2286

गोविंद वाकडे, मावळ

16 एप्रिल : राजकीय कोलांट्या मारणार्‍या उमेदवारांमुळे पश्चिम महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी मावळमध्ये चौरंगी लढत बघायला मिळतेय.

मावळ मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन बाबरांना उमेदवारी नाकारत शिवसेनेनं श्रीरंग बारणेंना उमेदवारी दिली. त्यानंतर बाबरांनी मनसेत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असताना अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर ते राष्ट्रवादीमधून बाहेर पडले. अखेर राष्ट्रवादीनं शिवेसेनेचे नाराज नेते राहुल नार्वेकरांना मावळमधून रिंगणात उतरवलं आहे. या सगळ्या गोंधळामध्ये मारुती भापकरही आम आदमी पक्षाकडून उभे राहीले आहे. त्यामुळे मावळ मध्ये यंदा चौरंगी लढत रंगणार हे नक्की झालंय.

राहुल नार्वेकर आपण सुशिक्षित आहोत असा प्रचार करतायत. तर नवीन माणसावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रचार विरोधक करतायत. त्यातच लक्ष्मण जगतापांच्या बंडखोरीचा फटकाही राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गजानन बाबरांची बंडखोरी आणि नाराज कार्यकर्ते यांचा सामना बारणेंनाही करावा लागतोय.

मावळमधला प्रचार सध्या आरोप प्रत्यारोपांभोवती फिरतोय त्यामुळे विकासाचा मुद्दा आणि लोकांचे प्रश्न बाजूला राहिलेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close