मी कसाबची केस लढणार – अंजली वाघमारे

April 1, 2009 8:50 AM0 commentsViews: 2

1 एप्रिल, मुंबई सुधाकर कांबळे कसाबची केस लढवण्याचा निर्णय वकील अंजली वाघमारे यांनी घेतला आहे. कसाबची केस लढणार म्हणून वकील अंजली वाघमारे यांना झेड सिक्युरिटीची सुरक्षा राज्यसरकारने दिली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी 10 ते 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. आपण कसाबची केस लढणार की नाही यावर निर्णय घेण्यासाठी त्यांनी आज बुधवारपर्यंतची वेळ मागवून घेतली होती. कसाबचं वकीलपत्र स्वीकारल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता.त्यावेळी त्यांनी आपण कसाबची केस लढवणार नाही, असं शिवसैनिकांना लिहून दिलं होतं. पण संरक्षण मिळाल्यानंतर कसाबचं वकीलपत्र स्वीकारण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

close