राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी ठसा;यलो, फँड्री,चा ‘आजचा दिवस माझा’ !

April 16, 2014 5:46 PM0 commentsViews: 1163

346236_yellow_fandry_ajcha diwas majhaq16 एप्रिल : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी ‘दस का  दम’ दाखवत तब्बल दहा पुरस्काlर पटकावले आहे.आज (बुधवारी) 61 व्या राष्ट्रीय पुरस्करांची घोषणा करण्यात आलीय. अभिनेते सचिन खेडकर आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिकेत असलेला ‘आजचा दिवस माझा’ सिनेमाने उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

तर तुह्या धर्म कोंचा? सिनेमाला सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमाचा बहुमान देण्यात आलाय. समाजव्यवस्थेचा बुरखा फाडणार्‍या फँड्री सिनेमानेही आपला ठसा उमटवला आहे. फँड्रीचा जब्या अर्था सोमनाथ अवघडेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळालाय. तसंच ‘फँड्री’कार नागराज मंजुळे यांना फँड्रीसाठी बेस्ट डेब्यू दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झालाय.

त्यापाठोपाठ मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या यलोने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलीय. यलो सिनेमाला स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड आणि गौरी गाडगीळला स्पेशल ज्युरी मेन्शन ऍवॉर्ड जाहीर झालाय. तर अस्तू सिनेमासाठी सुमित्रा भावे यांना उत्कृष्ट संवाद आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अमृता सुभाष यांना जाहीर झालाय. तर हिंदीमध्ये जॉली एलएलबीने बेस्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावलाय. आणि बेस्ट कोरिओग्राफीसाठी भाग मिल्खा भाग, शाहीदसाठी बेस्ट दिग्दर्शकचा पुरस्कार हंसल मेहता यांना जाहीर झालाय.

मराठी सिनेमांचा गौरव

 • - उत्कृष्ट मराठी चित्रपट – आजचा दिवस माझा
 • - उत्कृष्ट बालकलाकार – सोमनाथ अवघडे – फँड्री
 • - सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा – तुह्या धर्म कोंचा?
 • - उत्कृष्ट संवाद – सुमित्रा भावे – अस्तू
 • - स्पेशल ज्युरी मेन्शन ऍवॉर्ड – गौेरी गाडगीळ – यलो
 • - उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अमृता सुभाष – अस्तू
 • - यलो सिनेमाला स्पेशल ज्युरी ऍवॉर्ड
 • -उत्कृष्ट पार्श्वगायिका – बेला शेंडे – तुह्या धर्म कोंचा?
 • - बेस्ट डेब्यू दिग्दर्शक – नागराज मंजुळे – फँड्री

बॉलिवूडची बाजी

 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – जॉली एलएलबी
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता- राजकुमार राव, शाहिद
 • बेस्ट साऊंड डिझाईन – मद्रास कॅफे
 • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – भाग मिल्खा भाग
 • सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म- रंगभूमी
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – हंसल मेहता, शाहिद
 • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट – जल
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सौरभ शुक्ला, जॉली एलएलबी
 • सर्वोत्कृष्ट सिनेमा ‘शिप ऑफ थिसियस’ 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close