‘दबंग’च्या घरी मोदींची उर्दू वेबसाईट लाँच

April 16, 2014 6:27 PM0 commentsViews: 2935

modi_urdu_website16 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासाठी उर्दू वेबसाईट तयार करण्यात आलीय. बॉलीवडूचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचे वडील सुप्रसिद्ध पटकथा आणि संवादलेखक सलीम खान यांनी आज (बुधवारी) नरेंद्र मोदींची उर्दू वेबसाईट लाँच केली आहेत.

सलमानच्या घरी या वेबसाईटचं लाँच करण्यात आलंय. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थिती होते. यावेळी सलीम खान यांनी नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला.

मी काँग्रेसचा निष्ठावान मतदार आहे. आजपर्यंत काँग्रेसला मतदान करत होतो. पण मी आता काँग्रेसवर जरा नाराज आहे. यावेळी उमेदवार पाहूनच आपण मतदान करणार असं सलीम खान यांनी स्पष्ट केलं. मी मोदींना भेटलो. माझ्यासाठी कुणीच अस्पृश्य नाही असंही ते म्हणाले.

विशेष म्हणजे या अगोदर सलमान खानने ‘जय हो’ या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी मोदींच्या घरी हजेरी लावली होती. तसंच पतंग महोत्सवात मोदी आणि सलमान खानने सहभागही घेतला होता. त्यावेळी मात्र सलमानने थेट मोदींना पाठिंबा देण्याचं टाळलं होतं. आता दबंगच्या घरीच मोदींच्या उर्दू वेबसाईटचं लाँच करण्यात आल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उचावल्या आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close