आता भारतात एटीएमची मोफत सेवा

April 1, 2009 9:33 AM0 commentsViews: 3

1 एप्रिलएटीएमचा वापर करणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आरबीआयने नुकतीच जाहीर केली आहे. आजपासून कोणत्याही बँकेच्या एटीएममधून तुम्ही पैसे काढलेत, तर त्यासाठी चार्जेस तर लागणार नाहीत तसंच बॅलन्स इन्क्वायरीसाठीही पैसे मोजावे लागणार नाहीत. आजवर दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून काढण्यात आलेल्या पैशांसाठी किमान 20 रुपये फी आकारण्यात येत होती. पण आता मात्र बँकांना ही फी आकारता येणार नाही. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून या सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येईल. पण क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढल्यास किंवा परदेशातल्या एटीएममाधून पैसे काढल्यास मात्र बँका फी आकारतील. ही खुशखबर एप्रिल फुल नसून तमाम ग्राहकांसाठी खरंच जणू काही 'All Time Money' अशी मोफत सुविधा ठरेल का ते पाहयला हवं.

close