दंगलीबाबत माफी नाहीच,चूक असेल तर फाशी द्या -मोदी

April 16, 2014 9:15 PM0 commentsViews: 2329

Image narendra_modi34_300x255.jpg16 एप्रिल : गुजरात दंगलीबाबत मी सर्व माध्यमांशी बोललो आहे. माझी काही चूक नसल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जर चूक असेल तर फाशी द्या असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय.

मात्र काही लोक दंगलीचा मुद्दा पुन्हा पुन्हा उगाळत आहेत असं टीकाही मोदींनी केली. सत्तेत आल्यावर रॉबर्ट वडरा यांच्या किंवा कुणाच्याही बाबत सूडबुद्धीने वागणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. यात त्यांनी आपल्यावरील आरोपांचं खंडन केलंय आणि अनेक मुद्यांवर सडेतोड भूमिका मांडली.

राजकारणामध्ये कोणीही वर्ज्य नाही. वैयक्तिक पातळीवर अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत, असं सांगत मोदींनी अण्णा द्रमुकशी निवडणुकीनंतर युतीचे संकेतच त्यांनी दिले. तसंच शरद पवार आपल्यावर टीका करत असले तरी त्यांच्याशी चांगले संबंध असल्याचंही मोदी म्हणाले. त्याचबरोबर मला कसलाही बदला घ्यायचा नाही. मला त्यासाठी वेळ नाही. लोकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यामध्ये जास्त रस आहे असं नरेंद्र मोदींनी या मुलाखतीत स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close