बिझनेस बोईंग जेट : हवेतलं तरंगतं ऑफिस

April 1, 2009 10:38 AM0 commentsViews: 6

1 एप्रिलभारताचं आतापर्यंतचं सर्वात महागडं बिगबजेट जेट 1 एप्रिलला आकाशात झेप घेणार आहे.अमेरिकेहून तब्बल नऊशे कोटी रुपये खर्च करुन मागवण्यात आलेलं हे बिझनेस जेट अत्यंत आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं 'हवेतलं तरंगतं ऑफिस'च आहे. एकदाच भरलेल्या इंधनावर हे जेट सुमारे सहा हजार हवाई मैलांचं अंतर कापू शकतं. हे खास बोईंग जेट फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठीच वापरण्यात येणार आहे. आज दिल्लीत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या विशेष बिझनेस बोईंग जेटचं उद्घाटन केलं.

close