माझ्यावर सोनियांचा दबाव नाही – पंतप्रधान मनमोहनसिंग

April 1, 2009 3:33 PM0 commentsViews: 78

1 एप्रिल मी सोनिया गांधी यांच्या दबाखाली काम करत नाही, असं प्रत्युत्तर देऊन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्यावरील आरोपप्रत्यारोपांचं स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान म्हणून काम करताना आपल्यावर सोनिया गांधींचा कुठलाही दबाव नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मनमोहन सिंग यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या विरोधकांना दिलेलं उत्तरच आहे. मनमोहनसिंग दुबळे पंतप्रधान आहेत. सोनिया गांधींचं सरकार चालवतात अशी टीका, विरोधी पक्ष कायम करत असतात. मनमोहनसिंग हे युपीएचे नाही तर काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असं मत शरद पवार यांनी काल मंगळवारी अकलूजमध्ये व्यक्त केलं होतं.

close