मतदान यंत्रात घोळ, याद्यात नावंही गायब !

April 17, 2014 4:54 PM14 commentsViews: 24788

562346pune_voting17 एप्रिल : ‘मतदान करा, आपला हक्क बजावा’ असं आवाहन सगळीकडून केलं जातंय पण आज ऐन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारराजाच्या हाती घोर निराशा आली. पुणे, सिंधुदुर्ग, सांगलीमध्ये मतदान यंत्रणात घोळ, मतदार यादीत नाव गायब असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे मतदारराजा आपल्या हक्काला तर मुकालाच पण मतदान न करता आल्यामुळे संताप व्यक्त केला.

पुण्यात यंत्रणात घोळ, यादीतून नावं गायब

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आज सकाळी मतदान यंत्रणेत मोठा घोळ समोर आला. भाजपला मतदान करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबल्यावर काँग्रेसला मत जात असल्याचं समोर आलंय. पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे 23 जणांनी मतदानही केलं होतं. यामुळे काही काळ एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलं होतं. त्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.

एवढेच नाही तर पुण्यात मतदार यादीत घोळ समोर आलाय. शंभर मतदारांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर नागरिकांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. या निवडणुकीत काहीही करू शकत नाही, पुढच्या निवडणुकीत बघू असं थातुरमातूर उत्तर दिलं. यावेळी मतदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. पण ज्यांची नावे मतदार यांद्यांमध्ये आहेत त्यांनाच मतदान करता येणार आहे. लोकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात त्याची दखल घेतली जाईल. पुर्ननोंदणी करतेवेळी त्यांचा यादीत समावेश होईल. पण आता मतदान करता येणार नाही अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली. एवढंच नाहीतर ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले आणि सलील कुलकर्णी यांचीही नावं गायब असल्याचं समोरं आलं.

सिंधुदुर्गात धनुष्यबाणाचं मत काँग्रेसला

सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राडा चांगलाच गाजला. आज सिंधुदुर्गात मतदान होत आहे पण याचे पडसाद मतदानावर उमटले की काय अशी शंका उपस्थिती झालीय. सिंधुदुर्गात मतदान यंत्रात बिघाडाचा अजब प्रकार उघड झाला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात पडवे माजगाव या मतदान केंद्रात शिवसेनेचं चिन्हं धनुष्याबाणासमोरचं बटण दाबलं तरीही ते मत काँंग्रेसला जातंय. त्यामुळे संतप्त मतदारांनी मतदान केंद्र तीन तास बंद पाडलं होतं. या गोंधळानंतर मतदान यंत्र सील करण्यात आलंय. पण, या प्रकारामुळे 63 मतदारांना मतदान करता आलेलं नाही. या 63 मतांसाठी निवडणूक आयोगाकडेचं मार्गदर्शन घेतलं जाईल, असं बूथ अधिकार्‍यांनी सांगितलंय.

सांगलीत अचानक शंभर नावं गायब

सांगलीत मतदान उत्साहात सुरू असले तरी मतदारयादीत घोळ आणि काही अप्रिय घटनाही घडल्यात. गावभाग परिसरातील 100 लोकांची नावं अचानकपणे मतदार यादीतून गायब झाली आहे. ओळखपत्रं असूनही मतदान न करता आल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे शेटफळ गावात स्वाभिमानीेच्या तालुका अध्यक्षाला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केलीये. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सतीश गायकवाड यांना राष्ट्रवादी कार्यकर्ता सोमनाथ गायकवाडनं मारहाण केली. दरम्यान, मतदारयादीत नाव नसल्यानं लोकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केलीये. सांगलीत एकूण 16 लाख 47 हजार मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहेत. मतदारसंघात 1275 मतदानकेंद्र आहेत.

शिर्डीत सेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनं मतदानाला सुरुवात झालीय. लोणीतल्या मतदान केंद्रावर शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र नेर्लेकर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मतदान केंद्रावर मतदान चिन्ह लाऊन फिरत असल्यामुळे या वादाला सुरुवात झाली. पोलीस अधिकार्‍यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असा आरोप नेर्लेकरांनी केलाय. तर शिवसेना बाहेरचे गुंड आणून दादागिरी करत असल्याचा विखेंच म्हणणं आहे .
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Anonymous

  Hyachi kaydeshir Dakhal koni gheil ka? Ki punha tasach ayushya jagaycha ahe amhi?

 • Ganesh Chaudhari

  Are Sagale zol chalale ahet… Nivadnuk Adhikari pan samil astil nakki… amche pan Button dabale tari sound yet nhywata… congress kontya tharala jate he changale example ahe… but BJP Shivsena kay karat ahet…. Vishwajit ne tar kalas ch kelay.. paise watap, 150000 sangali satara che voter ikade. ani Palkar sarkhe lakho log tyanchi nave matdar yadi tun kadhali…
  Nikhil Sir kay karu shakto apan ya sagalya yantrane la….
  Really shame on them…
  Ganesh Choudhary.. ek samnya Mulga…

  • namuchi

   अरे गणेश सांगली आणि पुण्यातील मतदान एकाच दिवशी होते….१५००० मतदार सांगलीत मत देवून पुण्यात मत द्यायला आणणे शक्य आहे का?…जर विचार कर…आणि शक्य असेल तर जरा समजून सांगतो कसे ते ?….अरे हो तुम्हला कॉंग्रेस बद्दल राग आहे पण कोन बद्दलचा राग ह्या थराला नेव्हू नये कि तुम्ही खोट्याचे हि समर्थन करायला लागा…IBN लोकमत हा जाणून बुजून संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या देत आहे…शीर्षक हि तसेच आहे…IBN ..तुमच्यावर टीका असली तरी हि प्रतिक्रिया छापाल अशी अशा करतो

 • वैभव कांगणे

  congress ha tar purna pane chorancha bajar ahe he punha ekda nidarshanas ale.

 • Manish Hegde

  Huge Disappointment inspite of being a citizen of the country, inspite of paying taxes to the government, inspite of holding a valid election id your name stands out of this voter list can any body explain me why is it so

 • amit

  punnha toch gholl kutlehibatan daba congress la mat ase nemi ka?—————-

 • walnit

  asach chalu rahila tari loka visartil ki he desh Mhatama Gandhincha ahe

 • akki

  i think stamp voting is the best option …. because electronic machine can be missed by anyone . we can see explain like congress thats most of the youth dont go to do voting ……………. some thing should be dont otherwise one day will come no bady will vote ……………. common person akshay

  • Chetan tiwari

   Yes true dis tym bjp shud get 300sits but agar congress aise krenge to election ka fayda hi kya?kyunki bjp ke votes bhi congress ko hi ja rahe h

 • vikrant

  we need voter list free voting. There should be one minimum address proof like Passport, Aadhar. and you should able to vote in that constituency of which the address belongs. This will be more popular in City area as many people have at least one photo proof and correct address proof. This will ensure no false voting will happen.

 • Surendra Gaikwad

  There should be re election and This body of election commission should be dismissed…Supreme court should look into this matter…there should be inquiry against this ….what Sivsena and BJP representative are doing …..? why they are not shouting….

 • Sachin Kanawade

  हा प्रकार उघडकीस आला पण ग्रामीण भागातल्या मतदारांना याबद्दल माहिती नसते त्याचं काय …। निवडणूक आयोग तरी गांभीर्याने बघेल का. जर मतमोजणीत एका मशीन मधून फक्त एकाच पक्षाच्या उमेदवाराला मत मिळाली तर निवडणूक आयोग आपली चूक काबुल करून त्यवर काही निर्णय घेइल का हा आता खरा प्रश्न आहे.

 • namuchi

  चला गणेश नाहीतर तुम्ही उत्तर दिलेत…पण कसे ते detail सांगितले नाही……अहो दीड लाख माणसे तिकडून इथे आणणार आणि हे कोणच्या हि लक्षात येणार नाही असे वाटत्ते तुम्हाला…ह्या दीड लाख माणसांनी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान करायचे म्हटले तरी किती वेळ लागेल सर्व दीड लाख संपायला…आणि मग ते तिथून पाठवणार…बर एक एक पाठवला तरी सर्वच्या सर्व दीड लाख येवू शकतात ?…हाडनवीस ने हे खोटे उठवल्यावर तर संघांचे स्वयंसेवक जागृत झाले होते आणि स्वतः हाडनवीस म्हणाला कि आमचे स्वयंसेवक डोळ्यात तेल घालून असणार मग हि दीड लाख माणसे सुटू शकतील त्यांच्या नजरेतून … का हे दीड लाख लोक अदृश्य होवून मतदान करणार… काय बोलता राव?……..चांगले सुशिक्षित वाटता फोटोवरून पण जातीचे आले कि कशी विकृत मानसिकता बाहेर पडती…. म्हणा उत्तराखंड मधून १५ हजार लोक आणि तेही फक्त गुजराती एक दिवसात सोडून आणणाऱ्या फेकुचे भक्त असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवतात……….

 • PD Pd Deshmukh

  voting machine mai jo fault huwa hai kisika vote aur kisiko ja raha hai yeh baat bhahot galat hai aur ho sakta isike piche kohi ho jo jan bhujakar racha huwa plan hai muje lagta election officer i mean jo bhi kohi hai unone yah sab dubara election lena chahiye aur pure desh ke machin voting check karna chahiye yah bahot baada kuch plan hai kyu ki public kisi aur ko dil se jitana chahengi aur machine ke fault ke wajah se kohi aur jit ke ayenga bhahot galat hai baat yeh india ya mai kuch bhi ho sakta isika matlab

close