हक्काचं मत, माझं मत

April 17, 2014 3:45 PM0 commentsViews: 2843

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात मोठ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे. पाचव्या टप्प्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झालंय. सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह दिसून येतोय. पुणे, सोलापूर, बारामती, माढा, बीडमध्ये मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत. नेत्यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सोलापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.तर बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील मनसे उमेदवार दीपक पायगुडे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नाांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनीही सकाळी लवकर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीदेखील मतदान केले. मतदारांना मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहानही पुरंदरे यांनी केले आहे. उन्हाचा कडाका टाळण्यासाठी लोकांनी सकाळीच मतदानाला येण्याला पसंती दिलीये. नांदेडचे पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी सकाळीच सपत्निक मतदान केलं.आदर्श घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या अशोक चव्हाणांसाठी आजची निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई आहे. अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे डी बी पाटील अशी लढाई आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close