जितेंद्र आव्हाड यांना हायकोर्टाची कारणं दाखवा नोटीस

April 1, 2009 3:56 PM0 commentsViews: 12

1 एप्रिल, मुंबई जितेंद्र आव्हाड यांना हायकोर्टाची कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 18 मार्चला ठाणे शहरातली 5 मजली इमारत तोडण्यास अतिक्रमण विभागाचं पथक पोहोचलं होतं. या अतिक्रमण विभाग पथकाच्या कामात त्यांनी अडथळा निर्माण केला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयात ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका यांनी याचिका दाखल केली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यावर हायकोर्टाची कारणं दाखवा नोटीस बजावल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनाही याबाबत अहवाल सादर करण्यास कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं.

close