पुणेकरांची सटकली, फेरमतदान घ्या !

April 17, 2014 9:48 PM2 commentsViews: 7138

17_april_voting_pune17 एप्रिल : उत्साहानं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेक पुणेकर नागरिकांना आज निराश व्हावं लागलं. कारण हजारो मतदारांची नावंच या यादीतून गायब असल्याचं समोर आलं. अनेक ठिकाणी मतदार यादीत गोंधळ असल्याचं समोर आलं. ‘आमची नावं मतदार यादीतून गायब कशी झाली ?’ असा सवाल विचारत पुणेकर नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना संध्याकाळी घेराव घातला.

भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी तर यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. शिरोळे यांनी फेरमतदान घेण्याची मागणीही केली. फेरमतदान घेतलं नाही तर उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशाराही शिरोळे यांनी दिलाय. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष वारे यांनीही उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे अहवाल देणार असल्याचं स्पष्ट केलंय.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आज मतदान यंत्रणेत मोठा घोळ समोर आला. भाजपला मतदान करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबल्यावर काँग्रेसला मत जात असल्याचं समोर आलंय. पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे 23 जणांनी मतदानही केलं होतं. यामुळे काही काळ एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलं होतं. त्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.

एवढेच नाही तर यानंतर मतदार यादीत घोळ असल्याचं समोर आलंय. शंभर मतदारांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर नागरिकांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. या निवडणुकीत काहीही करू शकत नाही, पुढच्या निवडणुकीत बघू असं थातुरमातूर उत्तर दिलं. यावेळी मतदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. एवढंच नाहीतर ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले आणि सलील कुलकर्णी यांचीही नावं गायब असल्याचं समोरं आलं.

तर दुसरीकडे उपजिल्हाधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी यावर खुलासा केला. मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही यासाठी आम्ही वारंवार आवाहन केलं. मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही हे तपासून घेण्याचं नागरिकांचं काम होतं. जर तेव्हाच हे कळालं असतं तर त्यांची नाव नोंदवून घेतली असती. आपलं नाव यादीत आहे की, नाही हे पाहणंही लोकांचं कर्तव्य आहे असं सांगत उपजिल्हाधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी मतदारांच्या डोक्यांवर खापर फोडलं.पण ज्यांची नावे मतदार यांद्यांमध्ये आहेत त्यांनाच मतदान करता येणार आहे. लोकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात त्याची दखल घेतली जाईल. पुर्ननोंदणी करतेवेळी त्यांचा यादीत समावेश होईल.

पण आता मतदान करता येणार नाही अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली. पण आतापर्यंत महापालिका, विधानसभा आणि लोकसभेसाठीही मतदान केलं असतानाही आमची नावं आताच गायब कशी झाली, असा सवाल पुणेकर नागरिक करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • viral shah

    this shows how congress representative in delhi of pune helping punekers….not even a single help nor word againgt these fraudals…. press any button counted in congress.. voters not allowed to vote list missing as files missing in all ghotalas….lakhs of fraudal ppl allowed to vote but not the real citizens and voters .. hats off to congress power in supressing indians by indian money… never earned a single penny of hard earn money hats of congress…

  • Deshpande Shashibhushan

    जवळ जवळ वीस लाख मतदार आहेत त्या सर्वांनी प्रत्येक वेळी नावे तपासायला जायचे का? आणि नवे तपासली नाहीत हे ठीक पण म्हणून मतदार यादीतून नवे गायब होणे, मतदान केंद्रे कितीही लांबची मिळणे, एका मतदार संघातील नाव दुसर्या मतदारसंघात जाने याला कोणत्या प्रकारची कार्य तत्परता म्हणायचे? मतदार यादीत घोळ , मतदान केंद्रात घोळ , मतदान यंत्रात घोळ हे सारे अनवधानाने घडते यावर जनतेचा विश्वास बसेल असे वाटते का? हि संपूर्ण मतदान प्रक्रिया बोगस आहे टी रद्द होऊन सर्व नागरिकांची नावे मतदारयादीत असल्याची खत्री करून घेऊनच फेरमतदान घेतले गेलेच पाहिजे!

  • Pingback: पुणे मतदार यादी घोळ प्रकरणी जनहित याचिका दाखल | IBN Lokmat Official Website

close