…नाहीतर गावचं पाणी बंद करू,पवारांची दादागिरी

April 18, 2014 2:50 PM10 commentsViews: 7088

18Image img_236312_ajitpawaronpatkar_240x180.jpg एप्रिल :  बारामती तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईचा प्रश्न भीषण आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये मतदारांना बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी दौरा केला. तिथेही पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दादांनी ‘सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु. तुमचे दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो, आम्हालाच मतदान करा’ अशी दमदाटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती मतदारसंघातल्या गावकर्‍यांना केली.

आपचे उमेदवार सुरेश खोपडे आणि महादेव जानकरांनी त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एका व्हिडिओच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या व्हिडिओत अजित पवार बारामती मतदारसंघातल्या मासाळवाडीच्या गावकर्‍यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर, गावचं पाणी बंद करू, असं अजित पवारांनी व्हिडिओत म्हटल्याची तक्रार खोपडे आणि जानकरांनी केलीय. पण, याबाबत पोलिसांनी अजून गुन्हा दाखल केलेला नाही. या धमकीबद्दल गुन्हा कधी दाखल होणार अशी विचारणा त्यांनी केली आहे.

मतदारांना धमकी :

‘उद्याच्याला कुणी काही जरी गडबड केली तरी सुप्रियाला मी बाहेरच्याकडून निवडून आणेन… पण जर तुमच्या गावाने शब्द फिरवला तर इथलं पाणी सगळं मी बंद करेन. मी तुम्हाला आताच सांगतो… जर मासाळवाडी किंवा कुणी… तर मला मशीनमध्ये दिसेल, मी सरळ त्या लोकांना सांगेन की जर तुम्हाला अशी मस्ती आली तर मला तरी काय घेणं देणं आहे? शेवटी एका गावावरून माझी बहीण पडायची राहत नाही किंवा निवडून यायची राहत नाही.’

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • niranjan chavan

  kay ajit dada ghabarale ki kay dhamkya det firatay paya khalchi jamin sarakali ka?

 • Ajay Pratap Salunkhe

  Congress / NCP Modi la Hitler mhantat …… mag hela kay mhanaycha ???????????????????????????????????????????????????????????????

 • Ravindra

  Gunha dakhal honar pan nahi..Gruh mantralay hyanchyakadech aahe na!!!

 • Vikram

  he aahe lok shahi :D

 • Vikram

  he aahe thok shahi

 • Vikram

  he aahe joke shahi

 • Uday Bhoite

  yala manatat sattechi masti ………

 • Prakash Patel

  Dada Supriya padel athva nivdun yeil pan tumache kahi khare nahi tehva Vidhan parishade var nivdoon jaa kaka sarkhe potapanyaachi soy hoel

 • Deshpande Shashibhushan

  हे वक्तव्य म्हणजे मंत्रिपदाच्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा सरळ सरळ भंग आहे, त्यामुळे अजित पवार यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, आणि मतदारांना धमकावल्या प्रकरणी त्यांना १० वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.

 • sakharam

  Janlokpal aana ani ghala ashya nich mansala jail madhey

close