प्रवीण आमरे : आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचे सहाय्यक कोच

April 1, 2009 4:04 PM0 commentsViews: 5

1 एप्रिलआयपीएलचा दुसरा हंगाम एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात सुरु होत आहे. अनेक वादविवादानंतर अखेरीस यावर्षी आयपीएलच्या मॅचेस साऊथ अफ्रिकेमध्ये होत आहेत. आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स सज्ज झालेत. प्रवीण आमरेंची सहाय्यक कोचपदी निवड करण्यात आली आहे. आयपीएलच्या जय्यत तयारीला लागलेल्या सर्व टीम्सच्या फ्रँचायजींना अनेक समस्यांना सामोरी जावं लागतंय. साऊथ-अफ्रिकेत मॅचसाठी 6 ठिकाणं निवडण्यात आली आहेत पण फ्रँचायजी तर 8 आहेत. सराव सामन्यांसाठी जागा मिळवण्यात आठही टीम्समध्ये चढाओढ सुरु झाली आहे. साऊथ अफ्रिकेतलं मोक्याचं ठिकाण डर्बन पसंतीस उतरलंय. डर्बनमधे 16 मॅचेस होणार असून तिथली अशियाई प्रेक्षकसंख्या सुद्धा जास्त आहे.ही जागा मिळवण्यासाठी सर्व टीम्सने जोरदार मोहिम सुरु केली आहे. मात्र यात मुंबई इंडिन्सची आघाडी दिसून येत आहे. टीम्सची इतर ठिकाणांवरही नजर आहे. टीम राजस्थान रॉयलनं मात्र केप कोब्रांस आणि वेस्टर्न प्रोव्हिन्सशी करार करत सरावासाठी केपटाऊनची निवड केलीय. तर कोलकाता नाईट रायडर्सचं लक्ष ब्लोमफोर्टवर लागलंय. काही टीम्सने प्रॅक्टीससाठी होम-लॅन्डमधीलच ग्राऊंड्सची निवड केली आहे. डेअर डेव्हिल्सनं एक एप्रिलपासून दिल्लीतच सराव सुरु केलाय. तर चन्नई-सुपर किंग्सने चन्नईमध्येच 10 दिवसांच्या शिबिराची योजना केली आहे. एकीकडे सरावाची ठिकाणं कायम करण्यासाठी सर्व फ्रँचायजीसची चांगलीच धावपळ उडालीय. तर दुसरीकडे सर्व टीम्सचा सराव कितपत होतो, हे आयपीएल मॅचेसमधल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्समधून दिसून येईल.

close