राजनाथ काहीही म्हटले तरी मोदींनाच पाठिंबा – राज

April 18, 2014 11:02 AM1 commentViews: 2548

18 एप्रिल : नरेंद्र मोदींना दिलेल्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमधलं शाब्दिक युद्ध थांबायला तयार नाही. मोदींना पाठिंबा दिल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी राज यांच्यावर टीका केली होती. मात्र, या पाठिंब्याबद्दल मोदींना अडचण नाही तर राजनाथ सिंह का बोलतात असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत विचारला आहे. ठाण्याचे मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांच्या प्रचारासाठी काल ठाण्यात सभा झाली.

यावेळी  विकासाच्या मुद्द्यावरच आपण नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. या विषयावर मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली असताना राजनाथसिंह यांना याबाबत बोलण्याची गरज नाही. मनसे भाजपमध्ये विलीन करण्याच्या सल्ल्याचा खरपूस समाचार घेत “मनसे म्हणजे यूपी आणि बिहारमधील पक्ष वाटला काय’ असा सवाल त्यांनी राजनाथसिंह यांना केला. काल राज ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिलं.

त्याचं बरोबर जर मोदींचं सरकार आलं तरी मनसेला मंत्रिपद नकोय असंही राज यांनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Prakash Patel

    man na man mai tera mehman.takala jayache aani bhaande lapvaayache

close