चेंबूर-सांताक्रूझ डबल डेकर फ्लायओव्हर आजपासून वाहतुकीसाठी खुला

April 18, 2014 9:01 AM0 commentsViews: 1206

santacruz chembur flyover18 एप्रिल :   मुंबईत पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) अखेर आज सकाळी 8 वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या डबल डेकर फ्लायओव्हरला पूरक असलेला अमर महल जंक्‍शन उड्डाणपूलही खुला होत आहे.

या फ्लायओव्हरमुळे सांताक्रूझपासून चेंबूरपर्यंतचा प्रवास अवघ्या 15-20 मिनिटांत शक्‍य होणार आहे. यापूर्वी वाहतूक कोंडीमुळे या प्रवासाला एक ते दीड तास लागत असे.

मुंबईत 24 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, आचारसंहितेमुळे या फ्लायओव्हरचं अधिकृतपणे उद्घाटन न होता तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. कुठलाही गाजावाजा न करता मोजक्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा फ्लायओव्हर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलं.  अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच डबल डेकर फ्लायओव्हर आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close