नोबेल पारितोषिक विजेते गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ यांचं निधन

April 18, 2014 12:06 PM0 commentsViews: 223

GABRIEL DEMISE18 एप्रिल :  जगविख्यात कोलंबियन लेखक आणि नोबेल पारितोषिक विजेते गॅब्रियल गार्सिया मार्क्वेझ यांचं काल मेक्सिको येथे निधन झाल. ते 87 वर्षाचे होते.

1982 साली साहित्य क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल गॅब्रियल गार्सिया यांचा नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला होता. गॅब्रियल मार्क्वेझ वयाच्या 23 व्या वर्षी आपलं पहीले पुस्तक लिहील मात्र या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी त्यांना 7 वर्ष लागली होती.

लीफ स्टॉर्म, वन हन्ड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड, ऑटम ऑफ द पॅट्रियार्क, लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा या आणि इतर पुस्तकांची वाचक आणि समीक्षकांनी विशेष दखल घेतली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close