देशाचे नवीन नौदलप्रमुख

April 18, 2014 2:15 PM0 commentsViews: 104

18 एप्रिल :  ऍडमिरल रॉबिन धवन यांनी काल नौदल प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळलाय. जवळपास दोन महिन्यांपूर्वी मुंबईत INS सिंधुरत्न या युद्धनौकेला अपघात झाला होता. त्यात दोन जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानतंर नौदल प्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता. तब्बल 10 महिन्यात नौदलात 14 दुर्घटना घडल्या. यातला सर्वात मोठा अपघात हा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये INS सिंधुरक्षक या युद्धनौकेचा होता. यात 18 जवानांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे युद्धनौकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं नवे नौदल प्रमुख धवन यांनी म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close