पुणेकरांच्या तक्रारीचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाऊस

April 18, 2014 2:42 PM2 commentsViews: 1765

Image img_84352_navi_mum_bogus_voting.trans_240x180.jpg18 एप्रिल :  पुण्यात काल मतदार यादीत नाव नसल्यामुळे हजारो मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. यानंतर ज्या मतदारांचे नाव यादीतुन गाळले गेले आहे अशा मतदारांनी 10 ते साडे अकराच्या दरम्यान तक्रार करावी असं आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केलं होत यानंतर आज अनेक मतदारांच्या तक्रारीचा ओघ सुरू झाला आहे.

प्रशासनानं या सर्व प्रकाराला जबाबदार धरलं आहे. मतदारांनीच याद्या चेक केल्या नाहीत, असं काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी म्हटलं. पण खरी परिस्थिती वेगळी असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून याद्यांसाठी मतदार पाठपुरावा करत आहेत. अनेक नागरिकांनी यादी तपासून प्रशासनाशी संपर्क साधला. पण त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दरम्यान, पुण्यात हजारो मतदार मतदानापासून काल वंचित असल्याचा निषेधार्थ पुण्यात वेगवेगळे राजकीय पक्ष आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत भाजपचे अनिल शिरोळे आजपासून विधानभवनाबाहेर उपोषणाला बसणार तर आम आदमी पक्षातर्फे रविवारी 20 एप्रिलला मतदानापासून वंचित राहिलेल्यांचा मेळावा घेणार आहेत.

.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close