लाचखोर अधीक्षकाला अटक

April 18, 2014 3:31 PM0 commentsViews: 738

arthar road jail18 एप्रिल : आर्थर रोड जेलचा अधीक्षक वासुदेव बुरकुलेला एसीबीने अटक केली आहे. एसीबीने बुरकुले याच्या घराची झडती घेतली असताना घरात 40 लाख रोख रक्कम सापडली आहे. त्याचबरोबर अनेक बँकांत त्याचे फिक्स डिपॉझिटही आहेत. त्याची एकूण मालमत्ता एक कोटींच्या घरात जाते.

आर्थर रोड जेल गेल्या अनेक वर्षापासून बदनाम झालं आहे. जेल प्रशासनातल्या कर्मचार्‍यांच्या बढत्यांची प्रक्रिया सध्या सुरू असून एका अधिकार्‍याने निरीक्षक दर्जाची परीक्षा दिली होती. या कर्मचार्‍याला पेपर तपासण्यासाठी 35 हजाराची लाच मागण्यात आली. पण या कर्मचार्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सापळा रचला आणि या सापळ्यात बुरकुले आणि सहउपअधीक्षक पाथ्रीकर हे दोघे लाच घेताना रंगेहात सापडले. त्यानंतर एसीबीने या दोघांना अटक केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close