सेटलवाड यांच्याभोवती खोट्या गुन्ह्याचा फास?

April 18, 2014 6:10 PM2 commentsViews: 805

सुधाकर काश्यप,मुंबई.

18 एप्रिल : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या विरोधात गुजरात पोलिसांनी पैशाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिस्ता सेटलवाड या गुजरात दंगली पीडित लोकांसाठी काम करतात. त्या सध्या पाठपुरावा करत असलेल्या जाफरी हत्याकांड प्रकरणात खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी हे आरोपी आहेत. तिस्ता यांच्यामुळे भविष्यात मोदी अडचणीत येऊ शकतात. यामुळे आता तिस्ता यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय, असं सीजेपी म्हणजेच ‘सिटीझन फॉर जस्टीस अँड पीस’ या संस्थेच्या पदाधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

गेली अनेक वर्षं दंगलग्रस्तांसाठी आणि मोदींविरोधात लढणार्‍या तिस्ता सेटवलाड अलीकडे भलत्याच प्रकरणात अडकल्या आहेत. तिस्ता यांनी सीजेपी या दंगलग्रस्तांसाठी काम करणार्‍या त्यांच्या संस्थेचा पैसा वैयक्तिक खर्चासाठी वापरला, असा गुजरात पोलिसांचा दावा आहे. अँलेक पदमसी, अनिल धारकर, फादर सेदि्रव, अभिनेता राहुल बोस असे अनेक मान्यवर या संस्थेचे सदस्य आहेत. तिस्ता यांच्याविरोधात दाखल केलेला खटला खोटा असल्याचं ट्रस्टच्या या पदाधिकार्‍याचं म्हणणं आहे.

गुजरातमध्ये 2002 साली भडकलेल्या दंगली अल्पसंख्याक नागरिकांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी सरकारने आपल्या कर्त्यव्यात कसूर केली आणि प्रसंगी जाणीवपूर्वक डोळेझाक केली, असा खटला झाकिया जाफरी यांनी दाखल केलाय. त्यांना तिस्ता सेटलवाड मदत करत आहे. मी मोदींविरोधात लढतेय, म्हणून मला त्रास दिला जातोय, असं सेटलवाड यांचं म्हणणं आहे.

आतापर्यंत तिस्ता यांना अनेकदा धमक्या देण्यात आल्या. तसंच त्यांच्याविरुद्ध चार ठिकाणी पोलिसांत तक्रारी नोंदवण्यात आल्या. तरीही तिस्ता यांचं काम सुरूच आहे. गुजरातच्या विविध कोर्टांमध्ये सरकारविरोधात किंवा भाजप नेत्यांविरोधात ज्या केसेस सुरू आहेत, त्यांच्यावर रोजच्या रोज देखरेख ठेवण्याचं काम त्या या संस्थेमार्फत करतात. त्यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळेचं संस्थेला 10 पैकी 9 खटल्यात यश आलंय आणि त्यात 117 जणांना जन्मठेपेची शिक्षा झालीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • raju

    Thats what FEKU does…. God knows, What would happen when he becomes PM.

  • sharad_kul

    Smt Tista Setawad ya konachi suprari ghevun kam kartat dusaryanche paise hadap karatat ani sarvjanik jivanat apan NGO mhanun kam karatana kontyahi gostla tond denyachi tayari karavich lagate sud bhavanane kam karttat ase disat ahe jya jay veles tya courtat jinkaly tenva mothy dimiakhane annandane modi virudha prachar karit aleley ahet aata ulati ginati suru zali ahe tenva tyalahi tond dyavech lagel ani khote aorp asatil court tumhala nyaya deailch

close